कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांची गळचेपी

केंद्र सरकारची कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांची गळचेपी

राज्यात अनपेक्षित पाऊस झाला नाही त्यामुळे शेती संकटात सापडली आहे. उरलेल्या पिकांचे मान्सूनोत्तर पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशात उरल्या सूरल्या कांदा शेतकऱ्यांने कसेबसे जगवले. मात्र केंद्र सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेतल्याने कांद्याला मातीमोल भाव मिळत आहे. या निर्णयामुळे सरकार जणू शेतकऱ्यांच्या जिवावरच उठल्याची जाणीव शेतकऱ्यांना होत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी केल्याने शेतकरी आणि व्यापारी दोघांमध्ये उद्रेक झाला असून शुक्रवारी ठिकठिकाणी आंदोलने झाल्यानंतर शनिवारपासून लीलाव बंद करण्यात आला आहेत. त्यामुळे कोट्यावधीची उलाढाल ठप्प झाली आहे. शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. कांदा निर्यात बंदी प्रश्नावर झोपलेल्या केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस सर्वेसर्वा खासदार शरद पवार रस्त्यावर उतरले आहे.

कांदा निर्यात बंदी विरोधात स्वतःखासदार शरद पवार मैदानात :

सोमवार दि. 11 ला चांदवड येथे चांदवड आग्रा रोडवरील चौफुली येथे सकाळी साडेदहा वाजता राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस कडून आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनाचे नेतृत्व स्वतः राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी पत्रकांची परिषद घेऊन सांगितले. केंद्र शासनाच्या कांदा निर्यात बंदीमुळे संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत कांदा निर्यात बंदी विरोधात नाशिक जिल्हा शेतकरी वर्ग संतप्त झाला असून जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. यातच शेतकऱ्यांसाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवार तारीख ११  रोजी चांदवड येथे आंदोलन होणार आहे. यावेळेस ते कांदा उत्पादन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *