पी.एम .किसान व नमो शेतकरी या कृषी योजनेच्या लाभापासून एक लाख शेतकरी वंचीत.

राज्यातील जवळपास एक लाख शेतकरी केंद्र शासनाची पी. एम. किसान योजना व राज्य शासनाची शेतकरी सन्मान योजनेचा लाभ कास्तकार बंधूंना मिळणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  शेतकऱ्यांचे बँक खाते आधार नंबरशी सलग्न नसेल तर  या दोन्ही योजनेचा लाभ घेता येणार नाही. या दोन्ही योजनेचा लाभ मिळून देण्यासाठी सरकारी यंत्रनेची धावपळ सुरु असताना केंद्राच्या पी. एम. किसान योजनेचेच लाभार्थी राज्य सरकाच्या नमो शेतकरी महा सन्मान योजने साठी पत्र ठरविण्यात आले आहे.

राज्य शासन लागलय कामाला

सध्या राज्य शासना कडून नमो योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांनच्या बँक खात्यात जमा करण्याची तयारी सुरु करीत आहे.
राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पी. एम. योजने चा पंधरावा हप्ता जमा झालेल्या शेतकऱ्यांची यादी मागितली आहे. ही माहिती या आठोदयाच्या आत येण्याची शक्यता आहे. या माहितीची महा आयटी कडून तपासणी करून नमोचा दुसरा हप्ता डिसेंबरच्या अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाईल. असे सूत्रांचे म्हणणे आहे.
बँक खाते आधार नंबरशी सलग्न असलेल्या शेकऱ्यांचा बँक खट्यातच निधी पाठवला जाईल अशी सूचना केंद्र शासनाने केली होती. परंतु चैदावा हप्ता देतांना ही अट शिथिल केली होती. आता पंधरावा हप्ता देतांना शासनाने बँक खते आधार नंबरशी सलग्न व ई – केवायसी (अर्जदाराची वैध ओळख ) व भूमी अभिलेख नोंदी करून घेण्याच्या सूचना केंद्र शासनाने राज्य शासनाला दिल्या होत्या या कडे दुर्लक्ष झाल्यामुळे एक लाख शेतकरी दोन्ही लाभा पासून वंचित राहिले आहे.

शेतकरी बंधूंनी करावयाची कामे.

आधार संलग्नता व ई – केवायसीची पुर्तता कृषी सहायकाच्या मार्फत करून घ्यावी. जेणे करून थकीत हप्ता व पुढील हप्ते मिळण्यासाठी अडचण येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *