मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेला मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती

जरांगे पाटलांच्या सभेला मुस्लिम समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. त्यामुळे मुस्लिम समाज बांधवांच्या आरक्षणासाठी मराठा समाज मुस्लिम बांधवांच्या नेहमीच पाठीशी उभा राहील असे आश्वासन जरांगे पाटील यांनी दिले. सभे पूर्वी बाळापुर येथे माजी आमदार नातिकोद्दीन खातीब व मुस्लिम समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले. काही नेतेच जाती जातीत झुंज लावण्याचे काम करीत आहे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका असे आहवान मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा अकोला जिल्ह्याच्या वतीने चरणगाव येथे आयोजित जाहीर सभेत बोलतांना केले. खानदेश आणि विदर्भातील मराठा एकत्र येत असल्याची सरकारला धास्ती असल्याचा टोला लगावात मराठा समाजातील एका भावाला ओबीसीचे आरक्षण मिळाले व दुसऱ्या भावाच्या मुलाला आरक्षण मिळण्यासाठी सहकार्य करण्याचे आव्हान त्यांनी केले. सरकारच्या तपासणीत मराठा समाजाच्या मराठा कुणबी अशा नोंदी आढळल्याने मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश करणे क्रमप्राप्त असल्याचे सांगत या संदर्भात गेल्या 70 वर्षात मराठा समाजाने सरकारवर विश्वास ठेवला मात्र मराठ्यांचा विश्वासघात झाला असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला. मराठा आरक्षणासाठी कायदा करण्याकरिता पुराव्याची गरज असून, त्या अनुषंगाने आतापर्यंत राज्यात मराठा कुणबी जाती संदर्भात 35 लाख नोंदी आढळल्याने आता 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

24 डिसेंबर असेल महत्वाची तारीख :

येत्या 24 डिसेंबर नंतर आरक्षण मिळाले नाही तर सरकारकडून ते कसे घ्यायचे ते आपण बघणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना दिला. मराठा आरक्षणासंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांच्या भूमिकेवर जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला. ”महाजन साहेब बहाने सांगू नका मराठा आरक्षणाचा कायदा पारित करण्यासाठी आम्ही सरकारला तीन महिने दिले असून 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण दिले नाही तर सरकारला जड जाईल असे सांगत आम्ही तुमच्या शब्दाचा सन्मान केला त्याच्या गैरफायदा घेऊ नका” गोरगरीब मराठ्यांचा विचार करून दिलेल्या शब्दाला जागा असा सल्लाही जरांगे पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांना दिला. आरक्षण मिळेपर्यंत राजकारण आणि नेता याबाबत कोणताही विचार न करता आता आरक्षणासाठी लढायचे आहे असे महिलांना आवाहन करीत ज्या नेत्यांना आपण मोठे केले त्यांनी समाजातील मुलांच्या आयुष्यासाठी काहीच केले नाही. असा प्रश्नही जरांगे पाटील यांनी केला. राजकारण करा पण तुमच्या मुलांच्या हक्काचं काय आणि आरक्षणाचं काय असे आवाहनही त्यांनी केले. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जरांगे पाटील यांनी टीकास्त्र सोडले. धनगर समाजाच्या आरक्षणात संदर्भात ते का बोलत नाहीत असे आरोप करीत धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

सभेतील विशेष :

  • सभेला मुस्लिम बांधव व महिलांची उपस्थिती.

  • मनोज जरांगे पाटील यांचे मार्गदर्शन सुरू करण्यापूर्वी चरणगाव येथे मराठा क्रांती मैदानावर जिजाऊ वंदना घेण्यात आली

  • मनोज जरांगे पाटील यांचे चरणगाव येथे आगमन झाल्यानंतर उपोषण मंडप स्थळी त्यांच्यावर दहा जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर सभास्थळावर मनोज जरांगे पाटील यांच्या वरती पुष्पगुष्टी करण्यात आली.

  •  चरणगाव कडे जाण्यापूर्वी बाहेर गावावरून राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्यांना चहा व नाश्त्याची मोफत व्यवस्था करण्यात आली.

  • सभेसाठी मराठा क्रांती मैदानावर सकाळपासून विविध ठिकाणाहून आलेल्या बांधवांसाठी मोफत खिचडीचे वाटप करण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *