नवीन तुरीला चांगला भाव मिळण्याचा अंदाज

नुकताच झालेल्या पावसाने तुरीचे मोठया प्रमाणात  नुकसान झाले आहे नवीन तुरीला सरासरी आठ हजार भाव मिळण्याचा अंदाज जाणकारां कडून दर्शविला जात आहे. नकत्याच झालेल्या पावसामुळे तुरीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या कारणामुळे तूर उत्पादनात आणखीनच घट होण्याची शक्यता आहे. या कारणांनी नवीन तुरीला चांगला भाव मिळू शकतो. तूर आवकेच्या हंगामात तुरीला आठ हजार च्या जवळपास भाव मिळू शकतो. आवक कमी झाल्यावर भावात अजून सुधारणा होईल असा अंदाज तूर बाजार मधील अभ्यासकांचा अंदाज आहे. पावसाने तुरीचे खूप नुकसान झाल्यास बाजाराचे समीकरण बदलण्याची खूप शक्यता आहे. आधीच मागील वर्ष्याच्या तुलनेत तूर लागवड कमी प्रमाणात झाली आहे. दुष्काळी परिस्थितीचा फटका पिकांना बसत असल्यामुळे उत्पादनही कमी राहण्याचा अंदाज होतच. पावसाने दिलेल्या फटक्या मुळे जास्त घट राहील असा अंदाज आहे.चार पाच दिवसापासून मराठवाडा, विदर्भात महत्वाच्या तूर उत्पादक भागात पावसाने धुमाकूळ घातल्याने तयारीचे खूप नुकसान झाले. तूर पीक, फुले, शेंगा भरण्याचा स्थितीत असल्यामुळे जास्त नुकसान झाले आहे. दुष्काळ व अवकाळी पावसामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी होण्याचा अंदाज आहे. कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यात तूर पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे उत्पादनात खूप घट होणार असल्यामुळे तुरेला चांगला भाव राहील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *