Dawood Ibrahim News – दाऊद इब्राहिम खरच मारला गेला असेल का ?

Dawood Ibrahim News –

भारतासाठी मोस्ट वॉन्टेड असलेल्या यादीत ज्याचे पहिले नाव आहे व २६/११ मुंबई शहरामध्ये बॉम्बस्फोटाची मालिका घडवून निष्पाप लोकांचे जीव घेणारा कुख्यात अपराधी अंडरवर्ल्ड माफिया पाकिस्तान येथील कराची येथ विष देऊन मारल्या गेल्याची बातमी आहे.आता सोशल मीडियावर आलेल्या बातमी नुसार आतंकवादी दाऊद इब्राहिम यास ह्याला 15 डिसेंबर रोजी विष देऊन मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. दाऊद इब्राहिम याला विष प्रयोग झाल्याचे समजताच त्याला करायची येथील हॉस्पिटलमध्ये अति दक्षता विभागात दाखल करण्यात आले. ही बातमी बाहेर पसरू नये याची दक्षता व अति गुप्तता पाळण्यात आली. दाऊद इब्राहिम याच्या सुरक्षेसाठी हॉस्पिटल मधील एक मजला पूर्णतः रिकामा करून तेथे नातेवाईक व सुरक्षा रक्षक यांच्याशिवाय कोणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला. ही बातमी पसरू नये म्हणून इंटरनेट सेवा ही बंद करण्यात आली आहे. आजपर्यंत पाकिस्तान जगाला हेच सांगत होता की दाऊद इब्राहिम हा आमच्या पाकिस्तान मध्ये नाही. आमचा याच्याशी कोणताही संबंध नाही. दाऊद इब्राहिम हा अमेरिका भारत यांच्या गुप्तचर यंत्रणेच्या “हीटलिस्ट ” वर असल्याने अमेरिका सारख्या गुप्तचर यंत्रणेपासून लपवण्यासाठी त्याची पाकिस्तान वारंवार जागा बद्दलत होता. आपली जगाला आतंकवादी देश अशी ओळख झाली आहे. आपण आपल्या देशामध्ये आतंकवाद्यांना शरण देतो. आपल्या देशात आपण जागतिक आतंकवादी ओसामा बिन लादेनला शरण दिली होती.
दाऊद इब्राहिम मुळे आपल्या देशाची प्रतिमा अत्यंत मलिन होत असल्याची जाणीव झाल्यामुळे कदाचित पाकिस्तानेच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची हत्या केली असावी असा दबक्या आवाजात पाकिस्तान मध्ये सूर निघत आहे. अशाप्रकारे अति गुप्ततेत दाऊद इब्राहिम यांचा दफन विधीही पार पडून पाकिस्तान आपले नाव नामे निराळे करण्याचे बोलले जात आहे.

दाऊद इब्राहिमच्या बहीणी नी दिली माहिती :

जानेवारी महिन्यामध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणा (एन.आय.ए. )ला दाऊद इब्राहिम ची बहीण हसीना पारकर हिने दिलेल्या माहितीप्रमाणे दाऊद इब्राहिम याने पाकिस्तानी महिलेशी दुसऱ्यांदा विवाह करून पाकिस्तान येथील कराची येथे राहत असल्याचे तपास यंत्रणा( एनआयए )ला माहिती दिली. दाऊद इब्राहिम याने पाकिस्तानातील विमानतळ चालवण्याची जबाबदारी घेतली असून सध्या दाऊद इब्राहिम व त्याचे सहकारी कराची विमानतळ चालत असल्याचे “एनआयए” ला तिने माहिती दिली आहे. भारताने वेळोवेळी दाऊद इब्राहिम पाकिस्तान मध्ये वास्तव्यास असल्याचा दवा केलाअसून पाकिस्तानने मात्र त्याचा नेहमी विरोध  केला आहे. काही प्रसार माध्यमांनी दाऊद इब्राहिम याचा दोन दिवसा पूर्वीच मृत्यू झाल्या असल्याचा दवा केला आहे.दाऊदच्या मृत्यूचे सत्य जगासमोर येईलच असे वाटत नाही. व पाकिस्तान हे जगासमोर येऊ सुद्धा देणार नाही. जर दाऊद इब्राहिम पाकिस्तान मध्ये मेला किंवा पाकिस्तान मध्ये दवाखान्यात असल्याचे जगजाहीर झाल्यास पाकिस्तान आतंकवाद्यांना व आतंकवादी कारवायांना खतपाणी घालतआहे हे जगासमोर येईल. त्यामुळे पाकिस्तान दाऊदची कोणतीही बातमी बाहेर येऊ देणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *