Prakash Ambedkar on CM – प्रकाश आंबेडकरांची सरकारवर टीका

Prakash Ambedkar on Maharashtra Government- प्रकाश आंबेडकरांची सरकारवर टीका

हिवाळी अधिवेशनात मुख्य मुद्दा प्रामुख्याने विदर्भातील ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, कांदा पीक, दुधाचे दर व शेतकऱ्यांच्या विविध समस्या हा प्रश्न विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अति महत्त्वाचा होता. परंतु सत्ताधारी पक्षांनी विदर्भीय शेतकऱ्यांच्या या महत्त्वाच्या मुद्द्याला बगल देत केवळ कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन बाबत निरर्थक दिखावू थातूरमातूर चर्चा केली. विदर्भीय शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधात पाहिजे तेवढे आक्रमक व प्रभावशाली दिसले नाही. एकंदरीत हिवाळी अधिवेशनात राज्य सरकार उदासीन व विरोधक अस्तित्वहीन दिसले असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ही खंत व्यक्त केली.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला केले आव्हान :

प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वाढती महागाई, दुष्काळी परिस्थिती, शेतमालाला भाव, वेगळा विदर्भ,
पिक विमा, मराठा आरक्षण अशा काही मुद्द्यांना हात घातला. शेतकऱ्यांचे प्रश्न मराठा आरक्षण याबाबत राज्य सरकारकडे कोणतेही योग्य धोरण नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले. तर काँग्रेस. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना न (उबाठा)व महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष यांनी सरकारच्या कोणत्याही मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडण्यात विरोधी पक्ष सपशेल अपयशी ठरला आहे. यावरून राज्यातील विरोधी पक्ष अस्तित्वहीन झाल्याची बोचारी टीका केली आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या एकंदरीत हालचाली अधिवेशनात विचारलेले प्रश्न यावरून विरोधक वर राज्य सरकार यांची मिली भगत असल्याचा आरोप देखील प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषद केला. तसे पाहता आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता शेतकऱ्यांचे व अनेक अति महत्त्वाचे प्रश्न या हिवाळी अधिवेशनात मार्गी लावून घेण्याची हीच योग्य वेळ असून संबंधित सर्व संघटनांनी संघटित होऊन आपापल्या मागण्यांचा पाठपुरावा करावा असे आव्हान यावेळेस प्रकाश आंबेडकर यांनी केला.

शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की सरकारने पीक विम्याची रक्कम मंजूर केल्याची घोषणा केली पण अजून मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सदर रक्कम अद्याप जमा झाली नाही. अनेक शेतकऱ्यांना अजून पर्यंत पीक विम्याची रक्कम मिळाली नाही हे वास्तव आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी कळकळीने करीत आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या या समस्येबाबत राज्य सरकार उदासीन असून शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडलेआहे. व विरोधक डोळेझाक करीत आहे. असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *